दिव्यांगान मिळणार मोफत सादने, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन
विशेष प्रतिनिधी/ पर्वरी
दिव्यांगसगसाठी सर्वतोपर मदत करण्यास सरकारने तयारी केली असून गोव्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांची साधन सुविधा पुरविली जाणार आहे. यासाठी गोव्यातील तालुकापातळीवर दिव्यांगासाठी शिबीरे आयोजित केली जाणार आहे. या सर्व दिव्यांगाना खास परिचय पत्र देण्यात येणार आहे यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर संबधीत खात्याना सुचना देण्यात आली आहे, असे मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पर्वरी येथील संजय शिक्षण संस्थेतर्फे समाज कल्याण खाते यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी ज्ञानवर्धीनी दिव्यांग प्रशिक्षण महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपिठावर उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, गोवा विद्यापिठाचे व्ही पिंटो, समाजकल्याण खात्याचे संचालक उमेशचंद्र जोशी पर्वरीतील संजय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपने केला दिव्यांगाचा विकास
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून खऱया अर्थाने दिव्यांगाचा विकास झाला आहे. दिव्यांग दिनानिमित्त आम्ही दिव्यांगाचा भल्यासाठी चांगल्या कामाचा शुभारंभ केला आहे. आज संजय शिक्षण संस्थेतील खास विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बीएड या कोर्सची सुरुवात केली आहे. रक्तदान शिबीरही केले, त्याचप्रमाणे दिव्यांगाना असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही राज्यातील तालुकापातळीवर ही शिबीरे आयोजित केली आहे. यामध्ये राज्यातील सर्व दिव्यांगाची उपस्थिती असणार आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. तसेच राज्यातील एकही दिव्यांग आता समस्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाल लागणारे गरजा पुरविल्या जाणार आहे. यासाठी सरकार सर्वतोपर प्रयत्न करणार आहे. असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रामोद सावंत यांनी सांगितले.
दिव्यांगसाठी आता मोफत सादने
या शिबीराअंतर्गत राज्यातील दिव्यांगाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. तसेच या शाबीराअंतर्गत दिव्यांग लोकांना लागणाऱया सर्व मशिनरी किवा त्यांची साधने सरकारतर्पे त्यांना मोफत पुरवल्या जाणार आहे. तीन महिन्याभितर संपूर्ण गोव्यातील तालुकापातळीर हे शिबीर होणार आहे. तसेच ज्या दिव्यांगाना योग्य उपचाराची गरज आहे त्यांना तो उपचार केला जाणार आहे. सर्व आरोग्य केंदावर तपासणी केली जाणार आहे.
राज्यात लवकरच कायमस्वरुपी दिव्यांग केंद
राज्यात दिव्यांगाची काळजी घेण्यासाठी अनेक बिन सरकारी संस्था कार्यरत आहे sत्यांना सरकारचे सहकार्य लाभत आहे आता दिव्यांगाची कायमस्वरुपी काळजी घेण्यासाठी लवकरच कायमस्वरुपी दिव्यांग केंद सरकार उभारणार आहे, दिव्यांगाच्या सेवेसाठी आता सरकार प्रमाणे जनतेनेही सहकार्य करावे. ज्यांना शिक्षक होऊन या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे त्यांनी हा बीएड कोर्स करावा असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातील समाजकल्याण खात्याचे संचालक जोशी यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे sस्वागत केले. अध्यक्ष पावसकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला यावेळी पुंदा चोडणकर व शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी आपले विचार व्याक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगाना भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन दुर्गेश माजिक यानी केले. मित्तल आमोणकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर यांचा वाढदिवस असल्याने केक कापुन साजरा करण्यात आला.