पेडणे / (प्रतिनिधी)
नामांकीत नियतकालीक इंडिया टुडेकडून गोवा राज्यास मिळालेला बहुमान व पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेसह पर्यटन विभागाला मिळालेले अग्रस्थान ही समस्त गोवेकरांसाठी गौरवास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केली.
विशेषतः पर्यटनात गोव्याला मिळालेल्या सन्मानामुळे जागतिक पर्यटनस्थळ असा लौकीक असलेल्या गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकाकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे गोवा राज्य पर्यटन विकासाच्या मार्गावर योग्यरित्या वाटचाल करत असल्याची पावती आहे, असे आजगावकर यांनी म्हटले आहे.
पर्यटन खात्याबरोबरच पर्यटन विकास महामंडळ, हा?टेल व शॅक्स व्यावसायिक, टॅक्सी चालक, पर्यटकांना सेवा पुरवणारे विविध व्यावसायिक, पर्यटनवृद्धीला सहकार्य करणाऱया स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या यशाचे श्रेय जाते. दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री डा?. प्रमोद सावंत यांच्याकडून वेळोवेळी मिळालेला पाठिंबाही तेवढाच महत्वाचा आहे, असे आजगावकर यांनी सांगितले.
पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याचा उच्च स्तराचा विकास व्हावा असे प्रयत्न गेली काही वर्षे आमच्याकडून होत आहेत. यातून पर्यटन वृद्धीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर आम्ही भर दिलेला आहे. त्याचे दृश्य परिणाम आज सगळीकडे दिसत आहेत. पर्यटनाचा सर्वंकष विकास साधणारे पयर्टन घोरणही आमच्या या प्रयत्नांचा भाग आहे. जागतिक पर्यटन नकाशावर गोवा चमकत राहावा हे आमचे उद्दीष्ट आहे. कोविड संकटकाळातही पर्यटन क्षेत्र पुन्हा उभारी घेईल याकडे आम्ही कटाक्ष ठेवलेला आहे, असे आजगावकर यानी सांगितले.
पर्यटन धोरणात आम्ही गोव्याच्या पर्यटन विकासाची दिशाची स्पष्ट केलेली आहे. किनारी भागातील पर्यटनाबरोबरच निसर्ग, साहसी, क्रीडा
व वैद्यकीय पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून किनारी भागासह अंतर्गत भागातील ग्रामीण जनतेलाही याचा लाभ मिळणार आहे. आगामी पर्यटन प्रकल्प हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून उभारण्यात येणार असून याचे दृश्य व सकारात्मक परिणाम पुढील काही वर्षांत दिसून येतील, असे आजगावकर यांनी सांगितले.