कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी बुस्टर दिला जात होता. दरम्यानच्या काळात झालेल्या अभ्यासातून 6 ते 8 आठवडÎांनी बुस्टर घेतल्यास त्याची परिणामकारकता अधिक असल्याचे केंद्रीय तज्ञ समितीला दिसून आले आहे. त्यामुळे तज्ञ समितीने कोविशिल्डचा बुस्टर 6 ते 8 आठवडÎांत घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. कोविशिल्डचा बुस्टर 6 ते 8 आठवडÎात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती दिर्घकाळ टिकते, असे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी स्पष्ट केले.
देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिटÎूटच्या कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी बुस्टर डोस आहे. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता दिसून आली आहे. कोरोनापासून अधिक प्रतिबंधासाठी बुस्टर डोस 6 ते 8 आठवडÎांत घ्यावा, असे केंद्रीय तज्ञ समितीने सोमवारी स्पष्ट केले.
नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनिझेशन (एनटीएजेआय) आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशनच्या तज्ञांची शनिवारी दिल्लीत बैठक झाली. बैठकीत अभ्यासातून आलेल्या निष्कर्षावर चर्चा झाली. कोविशिल्डच्या डोसनंतर 4 ते 6 आठवडे किंवा 28 दिवसांनी बुस्टर दिला जात होता. आता बुस्टर 6 ते 8 आठवडÎांदरम्यान देण्याचा निर्णय झाला आहे.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे म्हणाले, केंद्रीय तज्ञ समितीचा हा निर्णय फक्त कोविशिल्ड बुस्टर डोससाठी आहे. `कोव्हॅक्सिन’साठी नाही. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी याबाबत पत्र राज्यांना पाठवले आहे. यामध्ये कोविशिल्ड बुस्टरचा कालावधी 6 ते 8 आठवडÎादरम्यान केला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. बुस्टरसंदर्भात अभ्यासातून शास्त्रीय पुरावे समोर आले आहेत. साधारणतः 28 दिवसांनी बुस्टर घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पण हाच डोस 6 ते 8 आठवडÎांनी 48 ते 56 दिवसांत घेतल्यास रोगप्रतिकारकशक्तीत अधिक वाढ होते, दिर्घकाळ प्रतिबंधासाठी ते परिणामकारक ठरले आहे. याला भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
व्याधीग्रस्त, ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार
देशात कोविशिल्डचे दोन्ही डोस 75 लाख लाभार्थ्यांनी घेतले आहेत. तसेच 3 कोटी 75 लाख लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. लसीचा 28 दिवसांनी येणारा बुस्टर लाभार्थ्यांना 48 ते 56 दिवसांत दिला जाणार आहे. ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्तांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. रोगप्रतिकार शक्ती दिर्घकाळ टिकणार असल्याने लसीची परिणामकारकता वाढणार असल्याचे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.