ट्वाइलाइटच्या निर्मात्यांसोबत हातमिळवणी
‘ट्रिपल एक्स ः द रिटर्न ऑफ झांडर केज’नंतर दीपिका पदूकोन हिने पुन्हा एकदा हॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या ऍक्शन ड्रामानंतर दीपिका आता एका रोमांटिक कॉमेडी चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट क्रॉस कल्चरल थीमवर आधारित असेल, म्हणजेच चित्रपटात दोन विविध संस्कृतींचा मिलाप दर्शविण्यात येणार आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासह दीपिका याची एसटीएक्स फिल्म्ससोबत मिळून निर्मिती करणार आहे. दीपिका सध्या टेम्पल हिल प्रॉडक्शन्ससोबत बोलणी करत आहे. या कंपनीने ट्वाइलाइट प्रेंचाइजी आणि द फॉल्ट इन आवर स्टार्स यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
अर्थपूर्ण कंटेंट निर्माण करण्याची ही सुरुवात आहे. एसटीएक्स फिल्म्स आणि टेम्पल हिल प्रॉडक्शनसोबत भागीदारी झाल्याने आनंदी आहे. या दोन्ही कंपन्या प्रभावी आणि वैविध्यपूर्ण विविध संस्कृतींमधील समावेशक कथांना जागतिक व्यासपीठावर नेण्यास मदत करत असल्याचे दीपिकाने म्हटले आहे.
दीपिकाने ट्रिपल एक्समध्ये नायिकेची भूमिका साकारून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या चित्रपटात दीपिकाने विन डिझेलसोबत काम केले होते. दीपिका लवकरच 83 या चित्रपटात पती रणबीर सिंगसोबत झळकणार आहे.