पासपोर्ट-बोर्डिंग पास झाले कालबाहय़
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वात व्यस्त दुबई विमानतळ आधीच स्वतःच्या सेवांसाठी अत्यंत प्रख्यात आहे. आता यात एक असे वैशिष्टय़ जोडण्यात आले आहे, जे कुठल्याही सायन्स फिक्शनपेक्षा कमी वाटत नाही. तेथे देशात येणाऱया आणि जाणाऱयांच्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आयरिस-स्कॅनर लावण्यात आले आहे. कोरोना महामारीदरम्यान मानवी संपर्क कमी करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी या संपर्करहित तंत्रज्ञानाचा प्रचार केला जात आहे. काही सेकंदांमध्ये आता प्रवासी पासपोर्ट कंट्रोलचे काम पूर्ण करून मोकळे होते.
काही सेकंदांचे काम
आइरिस डाटाला देशाच्या फेशियल रिकग्निशन डाटाबेसशी संलग्न करण्यातआले असल्याने प्रवाशांचे ओळखपत्र किंवा बोर्डिंग पासची गरज भासत नाही. एमिरेट्स आणि दुबईच्या इमिग्रेशन अधिकाऱयांमधील सहकार्यातून डाटाचे एकत्रीकरण करण्यात येते आणि चेक-इनपासून बोर्डिंगपर्यंत सर्वकाही एकाचवेळी होऊन जाते.
टेहळणी तर नाही?
या तंत्रज्ञानावरून आता वेगळी चर्चाही सुरू झाली आहे. संयुक्त अरब अमिरातवर पत्रकार तसेच मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे आरोप होत राहिले आहेत. अशा स्थितीत अशाप्रकारच्या डाटा कलेक्शनुळे खासगीत्वावर धोका असल्याचे बोलले जात आहे. तर दुबईचे इमिग्रेशन कार्यालय प्रवाशांचा वैयक्तिक डाटा सुरक्षित ठेवत असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे.