प्रतिनिधी/ सातारा
सातारच्या दुर्गनाद ऍडव्हेंचर ग्रुपचे गणेश शिंदे यांनी नियोजन केल्यानुसार कलावंतीन दुर्ग व प्रबळगड हे अवघड दोन गड 36 मावळय़ांनी सर केले. त्यामध्ये साताऱयातील 27 जणांचा सहभाग होता तर कोल्हापूरातील 9 जण होते. यामध्ये 12 महिलांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवसांचा थरारक अनुभव या मोहिमेतील मावळय़ांनी गाठीशी बांधला. यामध्ये साताऱयाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्राहलयाचे अभीरक्षक प्रवीण शिंदे हे सपत्नीक सहभागी झाले होते.
कलावंतीन दुर्ग व प्रबळगड हे दूर्गप्रेमींचे आवडते ठिकाण. परंतु चढण्यासाठी अतिशय कठीण आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गनाद ऍडव्हेंचरचे गणेश शिंदे यांच्यासोबत अभीरक्षक प्रवीण शिंदे यांनी किल्ले चंदनवंदन, अजिंक्यतारा भटकंती केली होती. या मोहिमेत एका मेसेजवर 27 जण साताऱयातील आणि कोल्हापूर येथील 9 जण असे 36 जण सहभागी झाले. दि. 16 रोजी लक्झरी बसने कलावंतीनच्या दिशेने प्रवास सुरु केला. दुपारी 1 च्या दरम्यान खोपोलीजवळ पोहचले. अन् जवळच्या शिदोरीवर ताव सर्वांनी मारुन पुढची मार्गक्रमणा पायी सुरु झाली. सायंकाळी 4 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचले. किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली. ही वाट चालताना थोडासा श्रीमती इनमादार यांना त्रास झाल्याने अभिरक्षक शिंदे यांनाही किल्ला चढतो की नाही असे वाटत होते. गणेश शिंदे, संतोष खामकर यांनी सगळयांना धीर देत मोहिम सुरु ठेवली. किल्याच्यामध्ये सर्वजण पोहचले. तेथून वरचा निमूळता भाग चढण अवघड. मनात भिती आणि अंधारही झाला होता. किल्ला चढण्यास सुरवात केली. दोरीच्या सहाय्याने एकेकाने दगडी पायऱया चढून कलावंतीन दुर्ग सर केला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळय़ापर्यंत पोहचण्यासाठी 15 फुटाचे दोर लावले होते. खाली पाहिले तर दरी होती. दि. 17 रोजी पहाटे 3 वाजता प्रबळगडच्या चढाईला सुरुवात केली. तो कलांवतीनपेक्षा उंच असल्याने अवघड जात होते. मोहिम फत्तेकरुन 12 वाजता किल्ल्ला उतरण्यास प्रारंभ केल्याची माहिती अभीरक्षक शिंदें यांनी दिली. या मोहिमेत 12 महिलांचा सहभाग होता.