विधिवत पूजनाने शिवाजी उद्यानापासून निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत सुरुवात : गल्लोगल्ली भव्य स्वागत
प्रतिनिधी / बेळगाव
देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला यंदाही मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थितीत गुरुवारपासून प्रारंभ झाला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवपुतळय़ाचे विधिवत पूजन करण्यात आले. दुर्गामाता दौड यंदा भव्य प्रमाणात काढण्यासाठी शिवप्रति÷ानने आग्रही भूमिका घेतली होती. मात्र कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने प्रशासनाने नवरात्रोत्सवात गर्दी टाळण्यासाठी दांडिया, दुर्गामाता दौड यासह इतर बाबींना मनाई केली आहे.
अभिषेक, पूजन आणि आरती झाल्यानंतर प्रेरणामंत्राने शिवप्रति÷ानतर्फे काढण्यात येणाऱया पहिल्या दिवशीच्या दौडला शिवाजी उद्यानातून उत्साही वातावरणात चालना देण्यात आली. छत्रे गुरुजींच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. आई भवानीचा जागर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात दुर्गामाता दौड गल्लोगल्ली मार्गस्थ झाली. दरम्यान दौडमार्गावर रांगोळय़ा घालून स्वागत करण्यात आले.
कोरोनामुळे यंदा भव्य प्रमाणात दौड काढण्यात आली नसली तरी उपस्थित धारकऱयांचा उत्साह अमाप होता. प्रारंभी शिवाजी उद्यानात छत्रे गुरुजींच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. तर शिवप्रति÷ानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी शिवप्रभू दौडीमध्ये सहभागी होऊन क्रमांक पटकाविलेल्या धारकऱयांना ध्वज आणि शस्त्रांचा मान देण्यात आला. गतवषीदेखील कोरोनामुळे दुर्गामाता दौड साध्या पद्धतीने साजरी झाली होती. यंदादेखील निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ झाला. शासनाचा आदेश पाळत समाजहिताच्या दृष्टिकोनातून मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशीची दौड पार पडली. दरवषी शिवप्रति÷ानच्या दौडमध्ये हजारोंच्या संख्येने धारकरी सहभागी व्हायचे. मात्र मागील वर्षांपासून दौडवर मर्यादा आल्या आहेत.
मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, ऍड. श्यामसुंदर पत्तार, ऍड. प्रताप यादव आदींच्या हस्ते कपिलेश्वर मंदिरात आरती झाली. त्यानंतर ध्येयमंत्राने ध्वज उतरवून पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता झाली.