सेन्सेक्स 44.80 अंकांनी मजबूत : निफ्टीतही किंचीत तेजी
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारामधील मजबूत स्थिती आणि स्थानिक वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या तेजीच्या जोरावर चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्सने तेजी प्राप्त केली आहे. मंगळवारी दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 44.80 अंकांनी तेजी नोंदवत बंद झाला आहे. म्हणजे ही मागील तीन सत्रातील सलगची तेजी राहिली आहे.
भारतीय शेअरबाजारात आज मोठय़ा प्रमाणात चढउतार दिसून आले. आज सकाळी बाजार तेजीसह सुरू झाला. निफ्टीच्या निर्देशांकाने सकाळी सुरूवातीला 11 हजार 500 अंकांचा टप्पा पार केला होता. प्रमुख कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्सने दिवसअखेर 44.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,843.88 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा निर्देशांक 5.80 अंकांच्या हलक्मया तेजीसोबत 11,472.25 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये सर्वाधिक तेजीत बजाज फायनान्सचे समभाग चार टक्क्मयांनी नफ्यात राहिले. तसेच सोबत स्टेट बँक, टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, टाटा स्टील आणि लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहेत.
जागतिक पातळीवरील शेअर बाजारामधील सकारात्मक तेजीच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. या घडामोडींसह आशियाईसह अन्य बाजारांमध्ये जपानचा टोकीओ, दक्षिण कोरियाचा सोल हे लाभात राहिले होते. तसेच चीनचा शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार नुकसानीत होता. युरोपमधील प्रमुख बाजार प्रारंभीच्या काळात तेजीत राहिले होते. जागतिक तेल बाजारातील मानक ब्रेंट क्रूड 0.39 टक्क्मयांच्या वाढीसोबत 45.82 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. विदेशी विनिमय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.33 वर स्थिर होत बंद झाला आहे.