प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारी महिन्यापासून जिह्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेचा गेले पाच महिने जिह्यात मुक्काम आहे. ही लाट कमी होण्याचे नाव घेत नसून पॉझिटिव्हिटीचे चढ उतार सुरू आहेत. मुंबई-पुण्यात दुसरी लाट नियंत्रणात आली असताना सातारा जिह्याने मात्र शासनाचे टेन्शन वाढले आहे. शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 567 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत 19 बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सातारा जिह्याने वाढवले आहे शासनाचे टेन्शन
फेब्रुवारी महिन्यापासून सातारा जिह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सुरू झाला. मार्च महिन्यात या लाटेचा पीक जिह्यांमध्ये येऊन गेला, मात्र त्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली असली तरी पाच महिने उलटले तरी लाख आणखी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाचशे ते हजार यादरम्यान रोजचे नवे रुग्ण जिह्यामध्ये सापडत आहेत. सातारा हा मुख्य हॉटस्पॉट असून त्यापाठोपाठ सद्यस्थितीत कराड व फलटण हा हॉटस्पॉट आहे. याशिवाय ग्रामीण भागातही रुग्ण संख्या मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नसल्याने जिल्हा अजूनही तिसऱया टप्प्यात असून सध्या तरी यातून आणखी सवलत मिळण्याची शक्यता दिसत नाही.
लाट कमी होईना आणि लसीकरण वाढेना
दुसरी लाट कमी होण्याचे नाव घेत नसताना व तिसऱया लाटेची भीती असताना जिह्यात लसीकरण वाढवणे हाच एकमेव उपाय दिसत आहे. मात्र तरीही जिह्यात लसीकरणाची गती अजूनही व धिमी आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिह्याची परिस्थिती लक्षात घेऊन लसीकरण वाढवण्याच्या तसेच शासनाकडून येथे लसीचा जादा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
साताऱयात सर्वाधिक 130 रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 567 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 130 रुग्ण सातारा तालुक्यात आढळले आहेत. तर 129 रुग्ण कराड तालुक्यात आढळले आहेत.
नऊ तालुके दुहेरी आकडय़ात
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 6 (9444), कराड 129 (35656), खंडाळा 16 (13260), खटाव 48 (22097), कोरेगांव 37 (19406), माण 46 (15137), महाबळेश्वर 0 (4534) पाटण 14 (9652), फलटण 96 (31567), सातारा 130 (46116), वाई 44 (14577) व इतर 1 (1679) असे आज अखेर एकूण 223125 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.