सातारा / प्रतिनिधी :
देगाव ता. सातारा येथे घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी 57 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देगाव येथील वाघजाई ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या घरात अज्ञात चोरटय़ांनी दि. 24 ते 29 दरम्यान प्रवेश केला. घरात दरवाजा नसलेल्या कडाप्प्याच्या कपाटात पर्स ठेवली होती. या पर्समध्ये 25 हजार रूपये किंमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे झुमके, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे वेल, सोन्याची अंगठी, लटकन, चांदीची जोडवी, बिच्छवे असा एकून 57 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात हेमा सुर्यवंशी(वय 42) यांनी दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत.