लॉकडाऊनच्या काळात देवगड पं. स. ची कामगिरी : रखडलेल्या कामांना चालना : लाखो रुपयांची कामे मार्गी
वार्ताहर / देवगड:
कोरोना महामारीच्या साथीमध्ये मार्च महिन्यापासून अनेक विकासकामे खोळंबली होती. लॉकडाऊनच्या काळात शासनाने विकासकामे सुरुवातीला साथीचा फैलाव वाढू नयेत, यासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, कालांतराने जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार विकासकामे करण्यात आली. देवगड तालुक्यामधील विकासकामे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आली. त्यामुळेच रखडलेल्या कामांना चालना मिळाली. लाखो रुपयांची कामे मार्गी लावण्यात देवगड पंचायत समितीला यश आले. तालुक्यातील 348 कामांपैकी 141 कामे पूर्ण करण्यात आली.
देवगड सभापती सुनील पारकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि. प. बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता मुकुंद पाचपिंपळे यांनी देवगड तालुक्यातील विकासकामे लॉकडाऊनच्या काळात मार्गी लावण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे ग्रामीण भागातील कामांना चालना मिळाली. तालुक्यामध्ये 348 एकूण कामे मंजूर होती. त्यात 205 नवीन मंजूर कामे तर 2019 मधील 143 अपूर्ण कामे होती. 141 कामे पूर्णत्वास नेण्यात आली.
खासदार निधीतून सहा लाख 84 हजार खर्च
खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सन 2017-18 मध्ये जि. प. शाळा विजयदुर्ग नं. 1 मधील शाळेचा कंपाऊंड वॉल व सुशोभिकरण करणे कामासाठी 3 लाख 85 हजार रुपये, 2018-19 मध्ये पडवणे रेवंडेकर घराशेजारी संरक्षक भिंत बांधणे 1 लाख रुपये, सडेवाघोटन मुख्य रस्ता ते दिनकर वानिवडेकर दुकानापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 1 लाख 99 हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. चालू वर्षात 3 कामे पूर्ण करण्यात आली. तर एक काम निविदा प्रक्रियेत आहे.
आमदारांच्या निधीतून 22 लाख 63 हजाराची कामे
आमदार नीतेश राणे यांच्या आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत 2017-18 या वर्षात शिरगाव शेवरे मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता तयार करणे कामासाठी 5 लाख 78 हजार रुपये, 2018-19 या वर्षात पावणाई धुरीवाडी विठ्ठल रखमाई मंदिर ते पावणाई पाखाडीपर्यंत पायवाट करणे 2 लाख 96 हजार रुपये, कुवळे रेंबवली बौद्धवाडी मुख्य रस्ता ते गणेश खांदी सानापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 2 लाख रुपये, मुटाट येथे शासकीय ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर सभामंडप बांधणे 4 लाख 91 हजार रुपये, महाळुंगे देवळेकरवाडी ते शाळा नं. 1 नवलूवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 6 लाख 98 हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला.
डोंगरी विकास कार्यक्रमातून 24 लाख 68 हजार निधी
डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यामध्ये 16 कामे मंजूर होती. त्यापैकी 7 कामे पूर्ण करण्यात आली. 7 कामे निविदा प्रक्रियेत तर 2 कामे प्रगतीत आहेत. 2018-19 मध्ये ग्रामा 177 ते रामेश्वर मुख्य रस्ता ते अणपूर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी 4 लाख 98 हजार, पुरळ कळंबई मुख्य रस्ता ते पुरळ हुर्शी गणपतीमंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख 99 हजार रुपये, वेळगिवे विजयदुर्ग मुख्य रस्ता ते रामचंद्र मांडे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 2 लाख 50 हजार रुपये, साळशी मुख्य रस्ता ते गावकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 3 लाख रुपये, फणसगाव नरसाळेवाडी गोसावीवाडी रस्ता डांबरीकरण करणे 5 लाख रुपये, साळशी येथे पावणाई सिद्धेश्वर मंदिराजवळ हायमास्ट बसविणे 2 लाख 80 हजार रुपये, मिठबाव तांबळडेग ते अनंतवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 1 लाख 50 हजार एवढा निधी खर्च करण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ते कामांसाठी 2 कोटी 10 लाखाचा निधी
जिल्हा वार्षिक योजनेतून तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी 2 कोटी 10 लाख 46 हजार रुपये खर्च करण्यात आले. 2016-17 मध्ये ग्रामा 46 पासून पडवणे पालयेवाडी वाडातर पूल मारुती मंदिर ते ग्रामा 52 मिळणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 9 लाख 5 हजार रुपये खर्च, 2017-18 मध्ये प्रजिमा 4 ते मुणगे कारिवणेवाडी आचरापार प्ररामा 4 ला मिळणारा मार्ग ग्रामा क्र 331 साठी 12 लाख 76 हजार रुपये, 2018-19 मध्ये पुरळ ग्रामाक्र 34 ते पुरळ हुर्शी डोंगरकर ते करंदीकर घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख 99 हजार, तिर्लोट ग्रामा 25 ते तिर्लोट गाववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख 99 हजार रुपये, पोंभुर्ले मुख्य रस्ता वडाचीवाडी खडीकरण डांबरीकरण करणे चार लाख 94 हजार, पोंभुर्ले जांभवाडी पोंभुर्ले जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लाख 90 हजार रुपये, हडपीड ग्रामाक्र 271 ते हडपीड मधलीवाडी रस्ता तयार करणे 4 लाख 96 हजार रुपये, प्रजिमा 13 ते वरेरी मसरणवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख 94 हजार रुपये, प्रजिमा 13 पासून लिंगडाळ तिठा किंजवडे तेलीवाडी रस्ता तयार करणे 5 लाख रुपये, रामाक्र 178 ते कट्टा भंडारवाडी मार्गे रस्ता डांबरीकरण करणे 4 लाख 99 हजार रुपये, सांसद आदर्श ग्राम तळवडे तळेबाजार बागतळवडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 4 लाख 99 हजार, रामा 177 विजयदुर्ग जेटी ते विश्रामगृह रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 10 लाख रूपये, सन 2017-18 मध्ये इजिमा क्र. 21 ते फणसगाव धारंबा गढीताम्हणे रस्ता डांबरीकरण करणे 14 लाख 7 हजार रूपये, रा. मा. 178 ते कोळोशी आयनल चाफेड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 18 लाख 23 हजार, प्र. जि. मा. 17 पासून दहीबाव मिठबाव तांबळडेग तर मार्ग डांबरीकरण करणे 14 लाख 76 हजार, प्रजिमा 17 पासून दहीबाव मिठबाव तांबळडेग लहान पुल बांधणे 12 लाख 78 हजार रुपये, दहीबाव मिठबाव तांबळडेग रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 19 लाख 62 हजार रुपये, 2018-19 या वर्षात वळीवंडे चांदोशी बागतळवडे मार्ग डांबराने नूतनीकरण करणे 7 लाख 26 हजार रुपये, दहीबाव मिठबाव तांबळडेग तर मार्ग रस्ता डांबरीकरण करणे 6 लाख 88 हजार रुपये, इळये पाटथर प्रजिमा मार्ग डांबरीकरण करणे 7 लाख 99 हजार रुपये, तोरसोळे आरे प्रजिमा 16 ला मिळणारा रस्ता डांबराने नूतनीकरण करणे 9 लाख 99 हजार रुपये, राज्य मार्ग 178 ते कोळोशी आयनल मार्ग मोरी दुरुस्त करणे 7 लाख 43 हजार रुपये, धालवली कोर्ले तळीवाडी नरसाळेवाडी फणसगाव चव्हाटा रस्ता डांबरीकरण करणे 14 लाख 94 हजार रुपये खर्च करण्यात आले.
तालुक्यातील शाळा दुरुस्तीसाठी 29 लाख 39 हजार निधी प्राप्त
शाळा दुरुस्तीमध्ये 2016-17 मध्ये किंजवडे कोंडामा शाळा दुरुस्ती 4 लाख 14 हजार, तळवडे लाडवाडी शाळा दुरुस्त 10 लाख 65 हजार, सन 2018-19 मध्ये शिरगाव-शेवरे शाळा दुरुस्त 2 लाख 98 हजार, चाफेड भोगलेवाडी शाळा 1 लाख 88 हजार रुपये, पाळेकरवाडी नं. 1 शाळा 2 लाख 46 हजार रुपये, साळशी सरमळेवाडी शाळा दुरुस्त 3 लाख 90 हजार रुपये, बापर्डे शाळा इमारत दुरुस्त 3 लाख 32 हजार रुपये, पोंभुर्ले मालपे धनगरवाडी शाळा दुरुस्त 3 लाख रुपये, सन 2017-18 मध्ये आरे देवीचीवाडी येथे दोन वर्गखोली बांधणे 14 लाख 44 हजार रुपये, जि. प. शाळा बापर्डे धुरीवाडी येथे दोन वर्गखोली बांधणे 14 लाख 95 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.