प्रतिनिधी / देवगड:
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानांतर्गत देवगड शहरामध्ये सोमवारी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देवगड शेठ म. ग. हायस्कूल येथून देवगड बाजारपेठमार्गे मार्गे एस. टी. स्टॅण्ड अशी रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने, नगरसेविका सौ. प्राजक्ता घाडी, सौ. उष:कला केळूस्कर, नगरसेवक राजेंद्र वालकर, सुभाष धुरी, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, देवगड ग्रामस्थ मंडळाचे विलास रुमडे, शिवप्रसाद पेडणेकर तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी पथनाटय़ेही सादरीकरण करण्यात आली. तसेच स्वच्छतेच्या घोषणा, प्लास्टीक बंदी, स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देण्यात आले.