ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील 18 राज्यांमध्ये कोरोनाचा ‘डबल म्यूटेंट’ प्रकार आढळून आल्याची चिंताजनक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोर आणली आहे. (डबल म्यूटेंट म्हणजेच कोरोना विषाणूच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांमुळे संसर्ग होणे.) विषाणूचा हा नवीन प्रकार इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक आहे. मात्र, कोरोनाची वाढती आकडेवारी आणि विषाणूच्या या नवीन प्रकाराचा काही संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाचा हा ‘डबल म्यूटेंट’ प्रकार अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. भारतात हा विषाणू 15 ते 20 टक्के नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शेअर केलेल्या एकूण 10,787 पॉझिटिव्ह नमुन्यांमधील 771 नमुन्यांमध्ये नवीन विषाणूचे प्रकार सापडले आहेत. यामध्ये यूके (बी .1.1.7) चे 6 तर दक्षिण आफ्रिकी (बी 1.351) विषाणूचे 34 नमुने देखील आढळले आहेत. एक नमुना ब्राझील (पी.1) प्रकारातील आहे, जो पॉझिटिव्ह आढळला आहे.
ब्राझीलमधील Feevale विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या संशोधनातून ही बाब समोर आलीआहे. विषाणूया नाव P.1 आणि P.2 असे ठेवण्यात आले आहे.