ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 93 हजार 337 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 53 लाख 08 हजार 015 वर पोहचली असून, मृतांची संख्या 85 हजार 619 एवढी आहे.
सध्या देशात 10 लाख 13 हजार 964 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 42 लाख 08 हजार 432 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 6 कोटी 24 लाख 54 हजार 254 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 81 हजार 911 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.