ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात जुलै महिन्यात तब्बल 11.1 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 हजार 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनच्या अखेरीस देशातील कोरोना रुग्णांची संख्या 4 लाखांच्या वर होती. तेव्हा मृतांची संख्या 11 हजार 988 होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावढ्यात कोरोना प्रसाराचा वेग वाढला. या 15 दिवसात देशात 7.3 लाख कोरोना रुग्ण वाढले आहेत.
दरम्यान, मागील 24 तासात देशात 57 हजार 117 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 764 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16 लाख 95 हजार 988 वर पोहचली असून, मृतांची संख्या 36 हजार 511 एवढी आहे.
सध्या देशात 5 लाख 65 हजार 103 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 10 लाख 94 हजार 374 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 58 हजार 659 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 25 हजार 689 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.