ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात यंदाच्या वर्षातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या गुरुवारी आढळून आली. मागील 24 तासात 23 हजार 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 117 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 13 लाख 08 हजार 846 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 308 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 2 कोटी 61 लाख 64 हजार 920 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
गुरूवारी 15,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 53 हजार 303 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 97 हजार 237 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 22 कोटी 49 लाख 98 हजार 638 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 40 हजार 345 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.11) करण्यात आल्या.