ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 04 लाख 13 हजार 417 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 37 हजार 398 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 2 लाख 25 हजार 449 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 18 हजार 139 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20 हजार 539 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 234 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 570 एवढी आहे.
देशात आतापर्यंत 17 कोटी 93 लाख 36 हजार 364 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 35 हजार 369 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.07) करण्यात आल्या.