ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 26 हजार 291 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 118 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 725 एवढी आहे.
रविवारी 17,455 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 07 हजार 352 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 19 हजार 262 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 2 कोटी 99 लाख 08 हजार 038 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 22 कोटी 74 लाख 07 हजार 413 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 03 हजार 772 कोरोना चाचण्या रविवारी (दि.14) करण्यात आल्या.