ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 26 हजार 382 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 387 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 लाख 32 हजार 548 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 44 हजार 096 एवढी आहे.
मंगळवारी दिवसभरात 33,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 32 हजार 002 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 94 लाख 56 हजार 449 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 15 कोटी 66 लाख 46 हजार 280 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 85 हजार 625 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.15) करण्यात आल्या.