खड्डे व पाण्याने भरलेला रस्त्यात स्विमिंग, मासेमारी : आमदार दीपक केसरकर यांच्यावर उपरोधिक टीका
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग – बांदा तसेच दोडामार्ग – वीजघर या दोन रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱयांनी सासोली येथे उपरोधिक जलक्रीडा आंदोलन सोमवारी सायंकाळी केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाण्याने भरलेल्या खड्डेमय रस्त्यात स्विमिंग तसेच गळ घालून मासेमारी सुद्धा केली. आमदार दीपक केसरकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत दोडामार्ग – बांदा हा रस्ता जलपर्यटनासाठी खुला करत आहोत, अशी उपरोधिक टीकाही यावेळी उपस्थितांनी केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, अजय परब, संजय विर्नोडकर, अमित प्रसादी, मिलन परब, सुभाष गवस, शाणी बोर्डेकर, अविनाश नाईक, रवी नाईक, प्रशांत नाईक, संदीप देसाई, श्रीकांत ठाकुर, ब्रिजेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दोडामार्ग – बांदा तसेच दोडामार्ग – वीजघर या दोन प्रमुख राज्यमार्गावरील खड्डे तसेच रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडून गेल्या काही महिन्यांपासून विषय सुरू आहे. या सत्ताधारी व विरोधक या दोहोंत रस्त्यांची दयनीय अवस्था व निधी यावरून ‘तू तू मै मै’ होते आहे. काल या रस्त्यांवरून काही व्हॉटसऍप ग्रुपवरील चर्चेचे रुपांतर रविवारी दोडामार्ग बाजारपेठेत शिवसेना व भाजप आमनेसामने येण्यात झाले होते. आज सोमवारी सायंकाळी दोडामार्ग तालुक्मयातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सासोली तिठय़ाजवळ अनोखे जलक्रीडा आंदोलन केले. खड्डे व पाण्याने भरलेल्या रस्त्यावर या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी थेट स्विमिंग केले. तर काहींनी गळद्वारे मासेमारी केली. जिल्हय़ाचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. त्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग – बांदा हा खड्डेमय व जलमय रस्ता जलक्रीडा पर्यटनासाठी आम्ही खुला व घोषित करीत आहोत, अशी उपरोधिक टीकाही यावेळी नाडकर्णी यांनी केली.