न्यूयॉर्क येथे एक दुदैर्वी घटना उघडकीस आली असून पँक नामक गरीब माणसाला 20 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुणावण्यात आली होती. त्याने कोणती हत्या, दरोडा किवा लुटमार केली नव्हती तर एका सुपरमार्केटमधून दोन टी-शर्ट चोरले होते. चोरी करणे हा गुन्हा असला तरी त्याने अशी कोणती क्रूर शिक्षा केलेली नव्हती. पण येथील न्यायालयाने प्रँक याला कठोर शिक्षा सुणावत 23 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लढा दिला. अशा किरकोळ कृत्याबद्दल एवढी मोठी शिक्षा देणे हे लज्जास्पद आहे, असे म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने याचा विचार करून तीन वर्षाची शिक्षा कमी करत 20 वर्षांची शिक्षा सुणावली होती. प्रँक हा न्यूयॉर्क शहरात आपल्या पत्नी आणि एक सोबत रहात होता. वयाच्या 47 व्या वर्षी चोरी करताना तो सापडला होता. प्रँक आता 67 वर्षाचा असून दुर्दैवाची बाब म्हणजे तुरुंगातून सुटका होण्यापूर्वीच त्याची पत्नी, मुलगा आणि दोन भावांचा मृत्यू झाला आहे.
Previous Article‘एलआयसी’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.