वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कंपन्यांनी दुसऱया देशांमध्ये चालू वर्षातील मार्च महिन्यात 1.93 अब्ज डॉलर (14,495 कोटी रुपये) इतकी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) केलेली आहे. हा आकडा मागील वर्षातील समान कालावधीनुसार निम्म्यावर असल्याची माहिती आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) याच्या आकडेवारीनुसार देशातील कंपन्यांनी मार्च 2020 मध्ये अन्य देशांमध्ये जवळपास 3.86 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असल्याची नोंद आहे.
चालू वर्षात फेबुवारीमध्ये ओएफडीआय(बाहेर करण्यात आलेली एफडीआय) 1.95 अब्ज डॉलर होती. भारतीय गुंतवणूकदारांचा आपल्या विदेशी संयुक्त उद्योगासह अन्य शाखामध्ये चालू मार्चमध्ये एकूण 1.15 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा हिस्सा राहिला आहे. यामध्ये 41.325 कोटी डॉलर कर्ज रुपाने तसेच 36.354 कोटी डॉलर इक्विटी भांडवलाच्या स्वरुपात राहिली होती.
गुंतवणूक करणाऱया मुख्य कंपन्या
मोठय़ा गुंतवणूकदारांमध्ये प्रामुख्याने दूरसंचार कंपनीमध्ये भारती एअरटेल लि. , औषध कंपनी ल्यूपिन लि. आणि एसआरएफ लि. आदीचा समावेश आहे. भारती एअरटेलने मॉरिशसमध्ये आपल्या युनिटसाठी 75 कोटी डॉलरची गुंतवणूक केली असून ल्यूपिन अमेरिकेमध्ये आपल्या संयुक्त उद्योगामध्ये 25 कोटी डॉलर गुंतवले आहेत. भारती एअरटेलने मॉरीशसमध्ये आपल्या संपूर्ण टप्प्यावरील युनिटसाठी 75 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.