हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द सुसाइड स्क्वाड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 6 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात जॉन सिना आणि हार्ले क्विन महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील. याचबरोबर वायोला डेविस, मार्गोट रोबी, जोएल किन्नान आणि जय कर्टनी, अमांडा वालर, रिक फ्लॅग आणि कॅप्टन बूमरँग हे कलाकार चित्रपटात आहेत. जेम्स गन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात व्हिलरचा हिरो होण्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांना अत्यंत आवडला आहे. ट्रेलरमध्ये अनेक ऍनिमिटेड व्यक्तिरेखा असून जगाला वाचविण्यासाठी माणसांची साथ देताना दिसून येत आहेत.