ऑनलाईन टीम / चेन्नई :
मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तामिळच्या मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केली आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
वीजे चित्रा फक्त 28 वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन आपले जीवन संपवले आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील उद्योगपती हेमंत रवीसोबत तिचा साखरपुडा झाला होता. चित्रा या आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत होत्या.दरम्यान, हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
चित्राने डिप्रेशनमुळे हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. चित्राही एका मालिकेमध्ये काम करत होती. ईवीपी फिल्म सिटीमधून शूटिंगनंतर ती रात्री 2:30 वाजता हॉटेलमध्ये आली. ती हेमंत सोबतच राहत होती. घरी आल्यावर चित्राने ती अंघोळीसाठी जात असल्याचे सांगितले. पण ती बराच वेळ बाहेर आली नाही. त्यावेळी हेमंत ने तिला आवाज दिला पण कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर त्याने हॉटेलच्या स्टाफला याबाबत माहिती दिली. जेव्हा ड्युबलिकेट चावीने दार उघडले गेले तेव्हा ती सिलींगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
अभिनेत्री चित्राच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण कलाकारांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे.