नागरी सत्कार सोहळा उत्साहात : आमदार राजेश पाटील यांचे गौरवोद्गार : विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित : सत्कारमूर्तींकडून कृतज्ञता
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागातील धडाडीचे शिक्षक व पत्रकार म्हणून एन. ओ. चौगुले यांनी ठसा उमटविला आहे. शिक्षकी पेशाबरोबर पत्रकारितेतून समाजातील अन्यायाला वाचा फोडली आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.
उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उचगाव-कोवाड मार्गावरील स्वरमंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक बी. एस. होनगेकर, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, समितीचे नेते मनोज पावशे, शिवाजी सुंठकर, जि.पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, युवा काँग्रेस अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, ग्रा.पं. माजी अध्यक्षा योगिता देसाई, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर आदी उपस्थित होते.
राजेश पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्राr असते. एनओंच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी सिंधू ठामपणे उभ्या राहिल्याने एनओंनी सामाजिक, शैक्षणिक कार्यात ठसा उमटविला. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर खेळाचे धडे देऊन राष्ट्रीय पातळीर नेले. सीमाभागाबरोबरच चंदगड तालुक्मयातील प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मार्गी लावले. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी तुडये येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याचा सीमाभागातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
प्रारंभी मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन झाले. बाळासाहेब देसाई यांनी प्रास्ताविकात चौगुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. शीतल कंग्राळकर यांनी परिचय करून दिला.
समिती नेते मनोज पावशे म्हणाले, चौगुले यांना मिळालेले विविध पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती देतात. एन.ओं.नी अनेक विद्यार्थी खेळातही घडविले आहेत. ग्रामीण जनतेच्या समस्या वेळोवेळी वृत्तपत्रातून मांडून जनतेला न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक आणि पत्रकार म्हणून एन.ओं.चे समाजात उत्तम कार्य राहिले आहे. यावेळी बी. एस. होनगेकर, सरस्वती पाटील, एस. एल. चौगुले, मृणाल हेब्बाळकर, नागेश मन्नोळकर, सुजाता पाटील यांनी एन. ओं. च्या कार्याचा आढावा घेत गौरवोद्गार काढले.
यावेळी एन. ओ. चौगुले म्हणाले, मला उचगाव पंचक्रोशीतील जनतेने प्रेम आणि आदरभाव दिला. संस्थांनी सहकार्य केले आहे. हायस्कूल स्थापनेपासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील मंडळींचे चौगुले कुटुंबीयांनाही सहकार्य मिळाले आहे.
यावेळी चौगुले यांच्या कार्याचा आढावा चित्रफितीद्वारे घेण्यात आला. एन.ओ. चौगुले यांचा सपत्निक नागरी सत्कार करण्यात आला. विविध संस्था पदाधिकाऱयांनी आणि मित्रमंडळींनी एन. ओं. ना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नागनाथ जाधव, मोहन बेळगुंदकर, भाऊ गडकरी, शिवाजीराव अतिवाडकर, जे. आर. काकतीकर, नारायण जाधव, एल. एस. होनगेकर, एस. एल. चौगुले, संभाजी कदम, रामा कदम, बंडू पाटील, सुरेश राजूकर, मनोहर होनगेकर, सदानंद पावशे यासह उचगाव पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी व चौगुले कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन दशरथ सूर्यवंशी यांनी केले. आभार एल. वाय. लाळगे यांनी मानले.