केएलएसला उपविजेतेपद : दहावीच्या विद्यार्थ्यांचे नियोजन
प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएससी विद्यालय आयोजित अल्फीया 2022 आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हीडन्स शाळेने सर्वसाधारण विजेतेपद तर केएलएस शाळेने उपविजेतेपद पटकाविले.
ज्ञान प्रबोधन मंदिर स्कूल आयोजित अल्फीया 2022 महोत्सवाचे उद्घाटन शाळेची माजी विद्यार्थिनी प्रतिक्षा पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, अतिशय प्रेरणा देणारी ही गोष्ट असून जिद्द, चिकाटी व हार न मानण्याची वृत्ती यांचे महत्त्व विषद केले. तरुण भारत ट्रस्टचे सेपेटरी जगदीश कुंटे यांनी, धीर देण्याची वृत्ती, अथक प्रयत्न आणि नि÷ा किती महत्त्वाची असते याविषयी उदाहरणासहीत स्पष्ट केले.
या महोत्सवाच्या बक्षीस वितरणप्रसंगी संकेश्वर येथील डॉ. शीतल भिडे, जगदीश कुंटे, महादेव गुरव व मंजिरी रानडे आदी उपस्थित होते. प्रारंभी मंजिरी रानडे यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. शीतल भिडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आजच्या स्पर्धात्मक युगात ससा आणि कासव यांच्या गोष्टी सुधारित स्वरुपात बदल करून एकमेकांना सहकार्य करून यशस्वी व आनंदी राहावे. चांगल्या सवयींचा अंगीकार करावा व इतरांच्या जीवनातही आनंद आणावा. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. समूहगीत, चित्रकला, वादविवाद, सिनेमा फोटोग्राफी, फॅशन शो, मिस्टर ऍण्ड मीस, सरप्राईज इव्हेंट यासह अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेचे संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे नियोजन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.