ब्लूमबर्ग बिलेनियरचा निर्देशांक जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुरु असलेल्या उलथापालथीचा परिणाम विविध घटकांवर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचा प्रभाव हा जगातील धनाढय़ लोकांवर सर्वाधिक राहिल्याचे पहावयास मिळाले असून यातील काही श्रीमंताचे स्थान कमी जास्त राहिले आहे. शेअर बाजारात तेजी आल्यानंतर इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी टेस्लाचे सह संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क जगातील तिसऱया नंबरचे श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत.
एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती सोमवारी 115 अब्ज डॉलर्सवर राहिलेली आहे. एलॉन यांनी फेसबुकचे सह संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर्सची आहे.
सन 2020 हे एलॉन मस्क यांच्यासाठी भाग्यशाली राहिल्याचे पहावयास मिळाले आहे, कारण ब्लूमबर्ग बिलेनियरच्या निर्देशांकानुसार चालू वर्षात आतापर्यंत मस्क यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 87.8 अब्ज डॉलर्सनी वाढ झाली आहे. समभागांनी तेजीची नोंद केल्यानेच हा बदल झाल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण 2020 मध्ये आतापर्यंत टेस्लाच्या समभागांनी 500 टक्क्मयांची तेजी मिळवलेली आहे.
आशियातील सर्वात धनाढय़ क्यावसायिक म्हणून रिलायन्स इंटडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची नोंद करण्यात आली आहे. परंतु या प्रवासात आपले मजबूत स्थान अंबानींनी गमावले असून त्यांची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. सध्याला मुकेश अंबानी यांची संपत्ती 79.8 अब्ज डॉलर्सची आहे. 28 जुलै रोजी अंबानींची संपत्ती 81.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली होती.
जगातील पहिले दहा
सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
नाव संपत्ती
जेफ बेजोस…… 202
बिल गेट्स……. 125
एलॉन मस्क….. 115
मार्क झुकरबर्ग.. 111
बर्नार्ड अर्नाल्ट. 85.7
वॉरन बफेट…. 82.5
स्टीव बॉल्मर.. 80.8
मुकेश अंबानी. 79.8
लॅरी पेज…….. 77.3
सर्जे ब्रिन…….. 74.9
संपत्ती अब्ज डॉलर्समध्ये