प्रतिनिधी /पेडणे
धारगळ येथील प्रसिद्ध श्री धारेश्वर माऊलीपंचायतन संस्थानची त्रैवार्षिक सभा रविवार 13 रोजी श्री धारेश्वर मंदिर सभामंडपात अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उदय प्रभुदेसाई, मंदार प्रभुदेसाई, घनःश्याम प्रभुदेसाई आदींनी यावेळी विचार मांडले. यावेळी सन 2022-2025 या तीन वर्षांसाठी संस्थांनी पुढील कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली. प्रकाश प्रभुदेसाई यांची सलग तिसऱयांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रमेश वंसकर (उपाध्यक्ष), घनःश्याम प्रभुदेसाई (सचिव), प्रकाश वंसकर (उपसचिव), अखिल प्रभुदेसाई (कोषाध्यक्ष), जयराम भाऊ वंसकर (मुखत्यार), कमलेश वंसकर (उपमुखत्यार) यांची निवड करण्यात आली. निर्वाचन अधिकारी म्हणून सुदेश प्रभुदेसाई यांनी काम पाहिले तर मामलेदार कार्यालयातून निवडणूक निरीक्षक म्हणून भावेश फातर्पेकर उपस्थित होते. प्रकाश प्रभुदेसाई यांनी उपस्थित महाजनांचे स्वागत करून देवस्थानच्या कामी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा केली. तर उपाध्यक्ष रमेश वंसकर यांनी आभार मानले.