अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प : सर्वत्र शांतता
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव हे व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे शहर असल्याने नेहमीच धावणारे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु या शहराच्या गतीलाही कोरोनाने ब्रेक लावला. लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशीही शुकशुकाट व सर्वत्र शांतता दिसत होती. रविवारी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प असल्याचे एकूणच चित्र शहर परिसरात दिसले.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे दोन दिवसांचा कडक विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनावश्यक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रविवारी दुसऱया दिवशीही शहरात कडक लॉकडाऊन झाल्याचे दिसून आले. शहरात प्रवेश करताच वाहनचालकांची चौकशी व वाहनांची तपासणी केली जात होती.
सकाळच्या सत्रात दूध व वृत्तपत्रांचे वितरण
रविवारी पहाटेपासून दूध व वृत्तपत्रे यांचे वितरण करणाऱयांची धावपळ सुरू होती. गवळी व्यवसाय करणारे घरोघरी जाऊन दूध देत होते. याच सोबत नागरिकही जवळच्या दूध विक्री केंद्रावर जाऊन दूध आणताना दिसले. सायकल तसेच दुचाकीवरून घरोघरी वर्तमानपत्र पोहोचविणाऱयांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. नंदिनीसह काही मोजक्मयाच दूध विक्री करणाऱया स्टॉलना परवानगी देण्यात आली होती.
मेडिकल सेवा दिवसभर कार्यरत
रुग्णांची औषधांविना हेळसांड होऊ नये यासाठी रविवारी दिवसभर मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. सकाळच्या सत्रात मेडिकलसमोर तुरळक गर्दी होती. त्यानंतर मात्र दिवसभर शुकशुकाट होता. हॉस्पिटल तसेच कोरोना सेंटरसमोर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची गर्दी होती. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यासाठी ऍम्ब्युलन्सचा सायरन मात्र दिवसभर घणघणत होता.
अनावश्यक फिरणाऱयांना शहाणपण कधी येणार?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु काही जणांच्या अती उत्साहामुळे त्याला खो बसत आहे. प्रशासनाने सूचना करूनही रविवारीही बऱयाच भागात गल्ल्या-गल्ल्यांमध्ये नागरिक फिरताना दृष्टीस पडत होते. केवळ पोलिसांना चकवा देण्यासाठी हे केले जात आहे का? असाही प्रश्न जाणकार व्यक्तींकडून केला जात होता. सायंकाळी व रात्री बऱयाच भागात क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम यासारखे खेळ खेळले जात होते. वॉकिंग करणाऱयांची संख्याही अधिक होती. त्यामुळे त्यांना शहाणपण कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.