दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद, शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट
प्रतिनिधी/ बेळगाव
कायम गजबजलेलं बेळगाव रविवारी मात्र पुन्हा एकदा थांबलं. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर पुन्हा एकदा नेहमी धावणाऱया शहरामध्ये शुकशुकाट पसरला होता. ना वाहनांचा आवाज, ना मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेली माणसं, रेल्वे-बसस्थानकात पसरलेली शांतता व निर्मनुष्य रस्ते असे बेळगावचे चित्र पाहायला मिळत होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. बेळगावकरांनी या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे यातून दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हय़ामध्ये वाढू नये याकरिता शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 36 तास लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. चौथ्या लॉकडाऊननंतर नियमावली शिथिल करण्यात आली होती. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. परंतु कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या पाहता रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
रविवारी याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मेडिकल, हॉस्पिटल, रुग्णवाहिका, दूध विक्री, वृत्तपत्र वितरण वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन ठेवण्यात आला. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर प्रथमच अशाप्रकारे कडक लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदीसदृश परिस्थिती शहरात होती. रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांनी शनिवारीच खरेदी केली होती.
सकाळचे चित्र
सकाळी 6 वाजल्यापासून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. दूध विपेते, घरोघरी वृत्तपत्र पोहचविणारे विक्रेते तितकेच दिसत होते. त्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवा देणाऱया व्यक्तींची ये -जा दिसून येत होती. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून महत्त्वाचे रस्ते बंद केले होते.
दुपारचे चित्र
रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्नासाठी ये-जा करणारे काहीच वऱहाडी दिसत होते. परंतु दरवेळीसारखा लवाजमा यावेळी दिसून येत नव्हता. काही मोजक्मयाच वऱहाडींना घेऊन लग्न समारंभ आटोपण्यात आले. औषध गोळय़ांची आवश्यकता असणारे मेडिकलमध्ये खरेदीसाठी जात होते. शहरातील काहीच पेट्रोलपंप सुरू होते, त्यावरही अत्यावश्यक सेवा देणाऱयांनाच पेट्रोल व डिझेल देण्यात येत होते.
सायंकाळचे चित्र
नेहमी वर्दळ असणाऱया रस्त्यांवर सायंकाळनंतर चिटपाखरूही दिसत नव्हते. अत्यावश्यक सेवा देणाऱया व्यक्ती पुन्हा घरी परतत होत्या. विनाकारण बाहेर पडणाऱया व्यक्तींना पोलिसांकडून हुसकावून लावण्यात येत होते. रात्रीपर्यंत शहर व उपनगरांमध्ये शुकशुकाट तसाच होता.
उद्यमबागमधील कारखान्यांची धडधड थांबली
बेळगावची औद्योगिक वसाहत अशी ओळख असणाऱया उद्यमबागमध्ये रविवारी शांतता होती. एरव्ही कामगारांची धावपळ, कारखान्यांमधील यंत्रांची धडधड, वाहनांचे आवाज ऐकायला मिळतात. परंतु रविवारी या औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट पसरलेला होता.
शहापूरच्या बाजारात शांतता
शहापूर तसेच बाजूलाच असणाऱया खासबागच्या बाजारात रविवारची गर्दी होत असते. परंतु रविवारी या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी घरीच राहत या लॉकडाऊनमध्ये आपला सहभाग नोंदविला.
वडगाव, अनगोळमध्ये शेतीची कामे जोमात
वडगाव व अनगोळमध्ये शेतकऱयांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांनी रविवारी सकाळपासूनच शेतामध्ये जाणे पसंत केले. पेरणीचे काम सुरू असल्यामुळे शेतामध्ये काम करणाऱयांची संख्या अधिक होती. परंतु उपनगरांमध्ये मात्र पूर्णपणे शांतता पसरली होती.
सदाशिवनगर, जाधवनगर स्तब्ध
सदाशिवनगरमध्ये कोरोनाग्रस्त सापडल्याने महत्त्वाचा भाग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. जाधवनगर येथे पूर्णपणे शांतता पसरली होती. अत्यावश्यक सेवा देणाऱया व्यक्तीच ये-जा करताना दिसत होत्या.