हरमल / वार्ताहर
येथील धी गोवा कपिला मल्टिपर्पज पतसंस्थेतर्फे मास्क वितरित केले जाईल. कोविड 19 च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर विविध शाखातुन ग्राहक व नागरिकांनी विनामूल्य घ्यावीत असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
ह्या पतसंस्थेच्या हरमल,मांदे व मोरजी शाखांतून 15 एप्रिल पासून सकाळी 11 नंतर, मास्क विनामूल्य देण्यात येईल.आगामी काळात तुये,पेडणेत शाखा उघडण्याचा मनोदय असल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी माहिती दिली.
गणपत पार्सेकर महाविद्यालयाच्या चेअरमन कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.धी गोवा कपिला मल्टिपर्पज सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत मास्क वितरण कार्यक्रम हाती घेण्यात येईल.हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या व्यावसायिक शाखेच्या 30 विध्यार्थी व अध्यापिकाच्या सहकार्याने तसेच तीन माजी विध्यार्थ्यांनी ज्यांनी स्वतःची आस्थापने सुरू केली आहेत,त्यांनी उपक्रमास सहाय्य केले.त्या शिवाय महिला मंडळातर्फे शिवून घेतल्याचे सांगितले. ह्या पतसंस्थेतर्फे दहा हजार मास्कचे वितरण करण्याचे लक्ष्य असून, पतसंस्थेतर्फे कापड व साहित्य दिले ,असे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले.दरवषीच्या पतसंस्थेच्या फायद्यातून 2 टक्के निधीचा विनियोग समाज भल्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मास्क तयार केल्या असून त्याचे वितरण पतसंस्थेच्या मार्फत करण्याचा उपक्रम कदाचित गोव्यात एकमेव असल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले.
सदर मास्क आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांच्या मार्गदर्शनानुसार खास सुती कपडय़ांचा वापर तसेच डोक्मयास बांधण्यासाठी दोऱया केल्या आहेत.एका मास्कचे दिवसा वापर केल्यास रात्री धुवून पुन्हा सकाळी त्याचा वापर करता येईल.कामानिमित्त बाहेर जाणाऱया व्यक्तींना दोन मास्क देण्याचे ठरविले असल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले.
सध्या लॉकडाऊन काळ वाढविला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी घेतलेल्या उचित भूमिकेस भारतवासीयांनी योग्य सहकार्य केले.आर्थिक नुकसानी भरून काढण्यासाठी खूप काळ जावा लागेल व त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करायला पाहिजे.पंतप्रधान मोदींनी हात जोडून केलेली विनवणी खूपच भावली व भारतीयांनी मनापासून साथ दिल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.गोमंतकीयांनी विनाकारण घराबाहेर न पडता लॉकडाऊनास सहकार्य करावे व सामाजिक अंतराचे भान बाळगावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.यावेळी त्यांच्यासोबत पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश शेटमांदेकर,संचालक तथा जीपं सदस्य अरुण बांधकर उपस्थित होते.यावेळी पत्रकारांना मास्क देऊन शुभारंभ करण्यात आला.