जगभरात कोरोनाच्या नव्या संकरावताराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशा स्थितीत कोरोनापासून बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान धूम्रपान केल्याने कोरोनाबाधित होण्याचा धोका अधिक असल्याचा दावा एका अध्ययनात करण्यात आला आहे. अध्ययनानुसार धूम्रपान कोरोना लक्षणांच्या वाढत्या जोखिमीशी निगडित आहे. धूम्रपान करणारे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता तुलनेत अधिक असल्याचे अध्ययनात म्हटले आहे.
किंग्स कॉलेज, लंडनच्या संशोधकांकडून करण्यात आलेले अध्ययन थोरॅक्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे अध्ययन धूम्रपान आणि कोविड-19 च्या गंभीरतेदरम्यान संबंधांवर प्रकाश टाकते. संशोधकांनी झोई कोविड लक्षण अध्ययन ऍपच्या विदाचे विश्लेषण केले आहे. ऍपच्या वापरकर्त्यांपैकी 11 टक्के जण धूम्रपान करणारे हेते. हे प्रमाण 14.7 टक्क्यांच्या ब्रिटनमधील संख्येच्या तुलनेत कमी आहे. एक तृतीयांशपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी बरे वाटत नसल्याची माहिती दिली होती.