प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे, पण याकायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. पण धुम्रपानामुळे विविध आजाराची उत्पती असल्याने कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. यामुळे धूम्रपान बंदीची कारवाई शहरात राबविण्यासाठी कायद्याचे धडे महापालिकेच्या अधिकाऱयांना देण्यात आले.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य खात्याच्यावतीने धूम्रपान बंदीबाबतच्या कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यशाळेत विविध माहिती अधिकाऱयांना देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, पण याची अंमलबजावणी केली जात नाही. पण धूम्रपान आणि गुटखा खाल्याने अनेक व्याधीना तोंड द्यावे लागते. या व्यसनामुळे काहीना जीव गमवावा लागला आहे. उघडयावर विक्री करण्यात येणाऱया तंबाखुजन्म पदार्थामुळे शाळकरी मुलांवर वाई&ट परिणाम होतात. तसेच धूम्रपानामुळे फुफ्फुसाचे आजार निर्माण होता. तसेच मुख व दातांना इजा होते. यामुळे धूम्रपानाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे किंवा धूम्रपान करण्यास बंदी आहे. तरीदेखील उघडपणे पदार्थाची विक्री केली जाते तसेच धूम्रपान केले जाते.असे केल्यास कायद्यानुसार एक हजार ते पाच हजार रूपये दंड आणि दोन ते पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे अशी माहिती देण्यात आली. तसेच कायद्याची अंमलबजावणी करून कारवाई करण्याची सुचना करण्यात आली. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.संजय डुमगोळ, महापालिकेचे पर्यावरण सहाय्यक अभियंते एच.व्ही. कलादगी, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.