वार्ताहर / नंदगड
खानापूर तालुक्मयातील 9 गावांचा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात नंदगड या प्रमुख गावचा समावेश असून बुधवारी गावातील उर्वरित सर्व रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. शिवाय कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गावातील लोक बाहेर व बाहेरचे लोक गावात येऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.
नंदगड गावात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून गावच्या जनतेने चार दिवसापूर्वी गाव सीलडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ग्राम पंचायतीमार्फत गावच्या दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया कोंडवाडा जवळील उमर खान पठाण यांच्या घरालगत बांबूच्या काठय़ा लावून येथील रस्ता बंद केला होता. तर पूर्व भागाचे प्रवेशद्वार असलेल्या निलाकरी हॉटेल जवळ बांबू लावून हा रस्ता बंद केला होता. बाजारपेठेत लोक जाऊ नयेत यासाठी चावडीजवळ कब्बर यांच्या दुकानाजवळ व जावेद खानापुरी यांच्या पान दुकानाजवळ बांबू लावून गावात येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. परंतु खानापूर-नागरगाळी रस्त्यावरील वाहतूक सुरू होती.
खानापूर-नागरगाळी वाहतूक पूर्णता बंद
बुधवारी गावचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये झाल्याने प्रशासनातर्फे कडक उपाय योजना जारी करण्यात आल्या. त्यानुसार लागलीच ग्राम पंचायतीने गावचे उत्तर द्वार असलेल्या नारायण मंदिराजवळ बांबू लाऊन तसेच नंदगड नाल्याजवळ बांबूच्या काठय़ा लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खानापूर-नागरगाळी रस्त्यावरील वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे.
नियंत्रण कमिटीतर्फे जीवनावश्यक : वस्तू पुरवण्याचे आदेश
कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्याने गावातील नागरिकांनी परिसरातील कोणत्याही गावात जाऊ नये व परिसरातील गावकऱयांनी नंदगडमध्ये येऊ नये हा दुहेरी उद्देश ठेवून याची अंमलबजावणी केली आहे. येथील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर एक नियंत्रण कमिटीची स्थापना करून त्या लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. नियंत्रण समितीने नंदगड गावांमधील रुग्णांची संख्या व कोरोना संदर्भात जागृती करण्याचे आदेश बजावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नंदगड गावातील कोरोना रुग्ण वाढू नयेत व ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत.