दोडामार्ग – वार्ताहर-
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी काल दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज पार पडली. काल एकूण 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील ओबीसी आरक्षणा अंतर्गतचे 11 अर्ज वगळून उर्वरित 40 अर्जाची छाननी झाली. त्यात 36 अर्ज वैध तर 4 अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण, तहसीलदार अरुण खानोलकर, तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रभाग क्रमांक 2 मधील विष्णू नारायण खांबला (राष्ट्रवादी काँग्रेस ) व पांडुरंग मधुकर खांबल (अपक्ष) या दोघांचे अर्ज अवैध ठरले. तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील लीना महादेव कुबल (शिवसेना) व प्रभाग क्रमांक 7 मधील राजाराम महादेव गवस (राष्ट्रवादी काँग्रेस ) यांचेही अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर असून दुपारी 3 वाजेपर्यन्त वेळ देण्यात आल्याचे वर्षा शिंगण यांनी सांगितले.