सातारा /प्रतिनिधी
शहर नगरपरिषद आणि कल्याणी ग्रुप यांच्यावतीने दि. 28 जानेवारी आणि 29 जानेवारी रोजी येथील शाहूकला मंदिर येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुंबई, पनवेल, रत्नागिरी, पुणे, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा येथील फक्त 16 मर्यादित सहभाग देण्यात आला होता.
दि. 28 जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन सातारा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, प्रसिद्ध व्यवसायिक वसंत जोशी, हेरंब जोशी, सातारा क्रिकेट असोसिएशनचे इर्षाद बागवान यांच्या उपस्थितीमध्ये झाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धा अतिशय नेटके, शिस्तबद्ध संयोजन, सहभागी संघांचे उत्तम सादरीकरणामुळे यशस्वी झाल्या. इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपली कला सादर करण्यासाठी तसेच नाटय़चळवळीमधील पुढील पिढी तयार व्हावी हा उद्देश समोर ठेवून स्पर्धा संयोजन करण्यात आले होते. सहभागी सर्वच संघानी अतिशय नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण विषयांना हात घालून आपल्या एकांकिका सादर केल्या. लहान लहान बालके निरागसपणे परंतु तितक्याच ताकतीने आपली भूमिका वठवत एकांकिका सादर करत होते. सर्वच संघातील या लहान कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने सातारकर आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि आम्हीच भविष्यातील नाटय़चळवळीचे आधारस्तंभ आहोत हे दाखवून दिले.
दि. 28 तारखेला 7 एकांकिका सादर झाल्या तर दि. 9 एकांकिका सादर झाल्या. स्पर्धा झाल्यानंतर लगेचच निकाल घोषित करून विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख उपस्थित म्हणून उद्योजक दत्ताजी थोरात, सातारा करागृहाचे सुप्रिटेंड शामकांत शेडगे, नगरसेवक सागर पावशे, राजेश मोरे, संयोजन कमिटीचे प्रमुख कल्याण राक्षे तसेच सातायांतील सर्व रंगकर्मी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वर्षा चौगुले आणि चंद्रकांत कांबीरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल ः रंगभूषा आणि वेशभूषा प्रथम क्रमांक – क ख ग पुणे (सात फेटेवाला), द्वितीय क्रमांक रंगरचना कला मंच पनवेल (मी श्री. छ. शिवाजी महाराज होणार). पार्श्वसंगीत ः प्रथम क्रमांक-बाराखडी नाटय़मंडळी सातारा (या चिमण्यांनो परत फिरा रे), द्वितीय क्रमांक-क ख ग पुणे (सात फेटेवाला). नेपथ्य ः प्रथम क्रमांक – श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी (थेंब थेंब श्वास), द्वितीय क्रमांक-क ख ग पुणे (सात फेटेवाला). प्रकाश योजना ः प्रथम क्रमांक बाराखडी नाटय़मंडळी सातारा (या चिमण्यांनो परत फिरा रे), द्वितीय क्रमांक श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी (थेंब थेंब श्वास). सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्राr ः प्रथम क्रमांक स्पृहा इनामदार (रसिक कला मंच सातारा), द्वितीय शर्वरी धडवई (बाराखडी नाटय़मंडळी सातारा), तृतीय अंतरा पाटील (ट्री थिएटर अकॅडमी पुणे), उत्तेजनार्थ सान्वी यादव, ज्ञाणेश्वरी कुरकुरे, गार्गी हंगेकर, सान्वी दाते, अनुष्का कदम, रिरोमा रोडे, शांभवी प्रभुणे, ऋतुजा इंगळे, तन्वी मगर, संयोगिता चौधरी, श्रीमयी सावंत, तनिष्का साकत.
दिग्दर्शन ः प्रथम संतोष माकुडे (क ख ग पुणे), द्वितीय युवराज केळुसकर (अलंकार कलाकादमी फाउंडेशन कोल्हापूर). सर्वोत्कृष्ट सांघिक एकांकिका ः प्रथम क्रमांक-सात फेटेवाला (क ख ग पुणे), द्वितीय चॅटिंग (रसिक कला मंच सातारा), तृतीय (अलंकार कलाकादमी फाउंडेशन कोल्हापूर), उत्तेजनार्थ प्रथम या चिमण्यांना परत फिरा रे (बाराखडी नाटय़मंडली सातारा), उत्तेजनार्थ द्वितीय मी श्री. छ. शिवाजी महाराज होणार (रंगरचना कला मंडळ पनवेल), उत्तेजनार्थ तृतीय – सखी (ट्री थिएटर अकॅडमी पुणे). सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय ः प्रथम क्रमांक अर्णव कुलकर्णी (क ख ग पुणे), द्वितीय कुणाल गौड (श्री बालाजी माध्यमिक विद्यालय इचलकरंजी), तृतीय क्रमांक रियांश माळी (बालगड रंगभूमी पुणे), उत्तेजनार्थ सोहम जाधव, ओम मिचकर, पृथ्वीराज धोत्रे, आयुष धुमाळ, आर्य लोखंडे, देवदत्त घोणे, यशोधन सावंत, निल सुर्वे, ओम घंटी, गौरव खोराडे, सिद्धान्त नगरकर, साईराज घोडेचोर.