ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर मलिक यांना सकाळी 7.30 वाजता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले असून, आर्थिक गैरव्यवहार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी सीआरपीएफ जवानांचा ताफा घेऊन नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी पोहोचले. स्थानिक पोलिसांनाही याचा सुगावा लागू देण्यात आला नव्हता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना समन्स दाखवून कार्यालयात चौकशीसाठी येण्यास सांगितले. त्यानुसार नवाब मलिक हे सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.