विषाणूचे नवे स्वरुप विशेषकरून लंडन आणि दक्षिणपूर्व इंग्लंडमध्ये आढळून आले आहे. या संकरावताराने पूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. परंतु विषाणूच्या या स्वरुपामुळे एखादा रुग्ण गंभीर झाल्याची घटना अद्याप समोर आलेली नाही. ब्रिटनमध्ये आढळलेला संकरावतार पूर्वीच्या विषाणूशी 90 टक्क्यांपर्यंत साधर्म्य राखतो. याचमुळे आमची लस त्यावरही प्रभावी ठरणार आहे. प्रयोग पूर्ण झाल्यावरच ठोस स्वरुपात सांगता येणार आहे. याकरता नवा डाटा मिळण्यास दोन आठवडे लागतील. नव्या संकरावतारासाठी लसीत किरकोळ बदल करावे लागतील, असे उद्गार बायोएनटेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगर साहिन यांनी काढले आहेत.
Previous Articleफ्रान्सकडून ब्रिटनला दिलासा
Next Article आगामी काळ खडतर : बायडेन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.