नव्या संकरावतारामुळे ब्रिटनवर अनेक देशांनी प्रवासबंदी लादली आहे. दुसरीकडे फ्रान्सकडून ब्रिटनला दिलासा मिळाला आहे. फ्रान्सने ब्रिटनला लागून असलेली सीमा काही अटींसह खुली केली आहे. फ्रान्सने हा निर्णय घेतला नसता तर ब्रिटनमध्ये अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा भासण्याची शक्यता होती. सीमेवर शेकडो ट्रक उभे असून यात अनेक युरोपीय देशांमधून आलेली सामग्री आहे. नाताळामुळे ब्रिटनच नव्हे तर पूर्ण युरोपमध्ये लोक खरेदी करत आहेत. याचमुळे ब्रिटनमध्ये प्रवास आणि वाहतूक बंदी हानिकारक ठरू शकत होती. ट्रकचालकांना दोन चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच ते ब्रिटनच्या सीमेत प्रवेश करू शकतील.
Previous Articleदक्षिण आफ्रिका : प्रवासबंदी
Next Article नवा संकरावतार 90 टक्के जुन्या विषाणूसारखा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.