एटीएमसह अन्य नियमांचा समावेश होणार : 1 जानेवारीपासून बदलाचे संकेत
नवी दिल्ली
नवीन वर्षांच्या प्रारंभी म्हणजे वर्ष 2022 मध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भात काही नियम बदलणार आहेत. यामध्ये 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे, कपडे-फुटवेअरची खरेदी करणे महाग होणार आहे. यासह 1 जानेवारीपासून सहा नियम बदलणार असल्याची माहिती आहे. याबाबत नवे नियम पुढील प्रमाणे राहणार आहेत.
1. एटीएममधून पैसे काढणे महाग
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोफत व्यवहारानंतर रोख रक्कम काढण्यासाठी शुल्क वाढविण्यास मंजुरी दिली आहे. बँक सर्व ग्राहकांकडून 20 रुपये प्रति व्यवहारावर शुल्क प्राप्त करणार आहे. यामध्ये कराचा समावेश होणार नाही. आरबीआयच्या आधारे मोफत व्यवहारानंतर बँक आपल्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार 20 रुपयाच्या ठिकाणी 21 रुपये लागू शकतील. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.
2.कपडे आणि फुटवेअर खरेदी महागणार
1 जानेवारीपासून कपडे आणि फुटवेअरवर 12 टक्के जीएसटी शुल्क लागू होणार आहे. भारत सरकारकडून कापड, रेडीमेड आणि फुटवेअरवर 7 टक्के जीएसटी वाढविण्यात येणार आहे. यासह ऑनलाईन स्वरुपात ऑटो रिक्षा बुकिंगवर 5 टक्के जीएसटी म्हणजे ओला उबर यासारख्या ऍप आधारीत कॅब सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर वाहन बुकिंग महागणार आहे. ऑफलाईन स्वरुपात बुकिंगमध्ये बदल होणार असून भाडय़ात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती आहे.
3. 15 ते 18 वयोगटासाठी व्हॅक्सिनेशनची नोंदणी
देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षातील लहान मुलांना कोरोना व्हॅक्सिनेशनसाठी नोंदणी करता येणार आहे. हा बदल 1 जानेवारीपासून कोविन ऍपवर नेंदणी करता येणार आहे. अधिकची माहिती सदरच्या ऍपवर राहणार आहे.
4.इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेचा नियम
इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेच्या खातेधारकांना 1 जानेवारीपासून अधिकची रक्कम काढण्यास व डिपॉजिट करण्यावर शुल्क आकारणी होणार आहे. बेसिक सेव्हिंग्स खात्यामध्ये प्रति महिना चार वेळा रक्कम काढणे मोफत असणार तर त्यानंतर ही रक्कम काढली तर प्रत्येक व्यवहारांवर 0.50 टक्के शुल्क लागू होणार असून यामध्ये कमीत कमी 25 रुपये इतके शुल्क राहणार आहे.
5.ऍमेझॉन प्राईमवर लाईव्ह क्रिकेट मॅच पाहता येणार
ऍमेझॉनवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्राईम व्हिडिओवर आता लाईव्ह क्रिकेट मॅच पाहता येणार असून ऍमेझॉन आगामी 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱया सिरीज पाहता येणार आहेत.
6.वाहन खरेदी महागणार
नवीन वर्षात प्रामुख्याने मारुती सुझुकी, रेनो, होंडा, टोयोटा आणि स्कोडासह अन्य सर्व कार कंपन्यांच्या कार खरेदीसाठी अधिकची रक्कम द्यावी लागणार आहे. टाटा मोर्ट्स 1 जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्के वाढ करणार आहे.