परदेशाहुन आलेल्या 614 पैकी 274 जणांची आरटीपीसीआर
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील 23 लाख 53 हजार 307 जणांचे स्वाब आतापर्यंत तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी 2 लाख 52 हजार 300 जण बाधित आतापर्यंत आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्त 2 लाख 44 हजार 827 जण बरे झाले आहेत. ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील आतापर्यंत 614 जण परदेशातुन आले असून त्यांच्यापैकी 274 जणाची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. जिह्यातील नव्याने 12 जण कोरोना बाधित आढळून आले तर मुक्त 21 जण झाले आहेत.
ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील 274 जणांचे आरटीपीसीआर
जेव्हा जगात ओमीक्रोनचा नवा व्हेरियंट आला त्याच वेळेस जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार परदेशातुन आलेले नागरिक शोधून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. त्यात 614 पैकी 274 जणांचे स्वाब तपासणी केली आहे. त्यात 270 जण निगेटिव्ह तर 4 जण कोरोना बाधित आढळून आले त्यात 3 जण ओमीक्रोनचे रुग्ण आढळून आले असून ते ही ठणठणीत आहेत. जावली तालुक्यात 8 जण परदेशातुन आले. कराड तालुक्यातील 128 जण परदेशातुन आले असून त्यापैकी 48 जणांची आरटीपीसीआर केली त्यात सर्वच निगेटिव्ह आले. खंडाळा तालुक्यातील 20 जण परदेशातुन आले असून 11 जणाची आरटीपीसीआर करण्यात आली. खटाव तालुक्यातील 36 जण परदेशातुन आले असून त्यापैकी 25 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. सर्वजण निगेटिव्ह आले. कोरेगाव तालुक्यातील 28 जण परदेशातुन आले असून त्यापैकी 25 जणांची आरटीपीसीआर केली ते सर्व निगेटिव्ह आले. महाबळेश्वर तालुक्यातील 12 जण परदेशातुन आले त्यापैकी 9 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. ते सर्वजण निगेटिव्ह आले. माण तालुक्यातील परदेशातून 13 जणांपैकी 5जणांची आरटीपीसीआर केली ते सर्व निगेटिव्ह आले. पाटण तालुक्यातील परदेशातुन आलेल्या 13 पैकी 2 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली ते सर्व निगेटिव्ह आले. फलटण तालुक्यातील परदेशातुन आलेल्या 38 जणांपैकी 29 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह तर 25 जण निगेटिव्ह आले. त्या 4 बाधितमधील 3 जण ओमीक्रोनचे बाधित असून त्यांची प्रकृती चांगली आहे. सातारा तालुक्यातील परदेशातुन आलेल्या 188 जणांपैकी 99 जणांची आरटीपीसीआर केली सर्वजण निगेटिव्ह आले. वाई तालुक्यातील परदेशातुन आलेल्या 49 जणांपैकी 21 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली त्यात सर्व निगेटिव्ह आले.
ङफलटण तालुक्यात सर्वात जास्त बाधितङ बाधित वाढ ही कमी झाली असून फलटण तालुक्यात सर्वात जास्त 4 जण बाधित आढळून आले आहेत. जावली, कराड, खटाव, माण या तालुक्यात प्रत्येकी 1 बाधित नव्याने आढळून आले. खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाटण आणि वाई या तालुक्यात शून्य बाधित आढळून आले. सातारा तालुक्यात 2 जण बाधित आढळून आले. तालुक्यानिहाय आतापर्यंत बाधित व कंसात आतापर्यंत मृत्यू पुढीलप्रमाणेः-जावली 10,059(224), कराड 39,324(1,254), खंडाळा 14,226(197), खटाव 25,965(662), कोरेगाव 22,002(515), माण 18,080(429), महाबळेश्वर 4,768(89), पाटण 10,162(375), फलटण 37,545(702), सातारा 52,271(1,546), वाई 15,819(405), इतर 2203(90), इतर 2,52,424(6,488).