करणीबाधा डोक्मयातून काढा
22.12.2021 ते 28.12.2021 पर्यंत
आदीमायेला, गुरुंना आणि वाचकांना सविनय सादर नमस्कार. मागच्या भागात षटकर्म काय असतात हे आपण पाहिले. भारतातल्या कुठल्याही शहरात जा, एक गोष्ट समान पहायला मिळेल. ती म्हणजे बोगस लोकांनी केलेल्या जाहिराती. ‘अकरा तासात समाधान.’ ‘वशीकरण स्पेशालिस्ट’ ‘सौतन से छुटकारा’, वगैरे वगैरे. अगदी लोकलच्या डब्यांमधून ते वर्तमानपत्रापर्यंत सगळीकडे यांचे जाळे पसरलेले आहे. सोशल मीडियावर तर या लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काय तर म्हणे ‘बंगालीबाबा, अघोरी तांत्रिक, काले जादू की महारानी’!! वर्तमानपत्रात बातम्या वाचूनसुद्धा लोक त्यात फसतात. कारणे फक्त 2. एक भीती आणि दुसरे आंधळी आशा. यू टय़ूबवर यांचे व्हीडिओज बघून लाखो रुपयांचा चुराडा करून घेतलेले किती तरी लोक आहेत. ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.’
मानवी मनाचे दोन कप्पे आहेत. जागृत मन आणि सुप्त मन. आपण दैनंदिन व्यवहारात जे विचार करतो, वागतो, बोलतो ते जागृत मन. सुप्त मन (sub-conscious mind) ही यक्षणीची जादूची काठी आहे. सुप्त मनाला दिलेली कोणतीही सूचना ते स्वीकारते आणि त्याप्रमाणे बदल घडवते. सूचना खरी आहे की खोटी, योग्य की अयोग्य याचा निर्णय सुप्त मन घेत नाही. हेप्नॉटिझममध्ये याचाच वापर केला जातो. एखादी सूचना किंवा विचार वारंवार जागृत मनात आला की सुप्त मनात जायला वेळ लागत नाही आणि एकदा का तो सुप्त मनात गेला की मग तसे बदल घडतातच. चांगले असो वा वाईट. 1939 साली शोध लागलेल्या ‘कर्लियन फोटोग्राफी’ने हे सिद्ध केले आहे की नुसता विचार करूनसुद्धा मनुष्य खरोखर आजारी पडू शकतो.
आता विचार करा, एखाद्याच्या घरात दुर्दैवाने एखादी व्यक्ती दगावते. नंतर योगायोगाने एखाद्याचा अपघात होतो किंवा पैसे बुडतात आणि अशात एखादा माणूस (?) भोंदू, पाखंडी त्यांना सांगतो की, तुमच्यावर करणी केलेली आहे. आणि इथेच घात होतो. माझ्यावर किंवा माझ्या घरावर कुणीतरी करणी केली आहे हा विचार इतक्मयांदा मनात येतो की तो मग सुप्त मनात जातो आणि मग जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसू लागते. तब्येत खालावते. आजारपण सुरू होते. हसते खेळते घर तणावाखाली येते. मग सुरू होतो उताऱयांचा खेळ. घरावरून, व्यक्तींवरून उतारे उतरवून रस्त्यावर टाकले जातात. उपायांच्या नावाखाली लाखो रुपयांची नासाडी होते.
तोच प्रकार कुलदेवता बंधनाचा. ‘कुणी तरी तुमचे कुलदैवत बांधून टाकले आहे. म्हणून तुमचे काम होत नाही’ असा साप कोणी तरी पायात सोडतात आणि पुढे मग तेच रडगाणे.
माणसाची इतकी ताकत आहे का की एखाद्या देवतेला बांधू शकतो? आणि बांधता येत असेल तर ती देवता कसली? या सगळय़ा भ्रमातून बाहेर यायला हवे. या साखळय़ा तोडा. करणी बाधा आधी डोक्मयातून काढा.
आपले काम आपण इमानदारीने केले. कोणाबद्दल वाईट चिंतलेदेखील नाही आणि परमेश्वराचे गोड नावे मुखात असले तर अशा गोष्टी वाऱयाला देखील उभ्या राहणार नाहीत.
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कशाची…. पर्वा बी कुणाची…
महाउपायः कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास असेल तर एकादशी करावी.
सोपी वास्तू टीपः मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वर, आपल्या बाजूने लाल कापडात तुरटी बांधून ठेवावी. नकारात्मकता येत नाही.
मेष
हा आठवडा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया लोकांसाठी महत्त्वाचा असेल. हेवेदावे आरोप प्रत्यारोप होतील. एखादे गुपित समजेल. मंगलकार्यावर पैसे खर्च होतील. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल, पण कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल.
उपाय/उपासना-महत्त्वाच्या कामापूर्वी गूळ खाऊन पाणी प्या. सावध रहा- शुक्रवार, शुभ अंक- 6, शुभ रंग- लाल
वृषभ
तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अचानक आजारपण येऊ शकते. जुनी येणी वसूल होतील. धनलाभाचे चांगले योग आहेत. कामानिमित्त प्रवास होईल. वाहन सुख मिळेल. प्रॉपर्टीच्या कामात यश. विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. पण यश डोक्मयात जाऊ देऊ नका.
उपाय/उपासना-गरीबाला वस्त्रदान करा, सावध रहा-मंगळवार, शुभ अंक-3, शुभ रंग-राखाडी.
मिथुन
तब्येतीच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी कुठल्याही शॉर्टकटचा वापर करू नका. प्रकरण अंगाशी येऊ शकते आणि तुमच्या प्रतिमेला डाग लागू शकतो. परिवारात सुसंवाद निर्माण होईल. आर्थिक बाबतीत सावध रहा. पैसे उधार देऊ नका. संततीकरता प्रयत्न करणाऱयांसाठी सुयोग आहे.
उपाय/उपासना- शिवलिंगावर दूध चढवा, सावध रहा-गुरुवार, शुभ अंक- 4, शुभ रंग- आस्मानी
कर्क
खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. बाहेरच्या खाण्यामुळे तब्येत बिघडू शकते. दिलेला शब्द पाळाल. छोटय़ा यात्रेचे योग आहेत, जमिनीसंबंधी वाद कमी होतील. उधारी दिल्यामुळे मनःस्ताप होईल. शेअर्समध्ये काम करणाऱयांसाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद संभवतात.
उपाय/उपासना-गुरुवारी दत्त दर्शन घ्या. सावध रहा-मंगळवार, शुभ अंक- 7. शुभ रंग-क्रीम
सिंह
मनात नकारात्मक विचार येतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. छोटीशी सहल आयोजित कराल. संततीसाठी काळ अनुकूल आहे. विरोधक शांत होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱयांनी गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्यावी.
उपाय/उपासना- गरजूला काळे पांढरे कांबळे दान करा, सावध रहा-रविवार, शुभ अंक-7, शुभ रंग-पांढरा.
कन्या
परिवारातील सदस्य आणि मित्र यांच्यामुळे सगळय़ा प्रसंगातून तरून जाल. कर्ज वाढू शकते. तब्येतीच्या दृष्टीने आठवडा उत्तम आहे. प्रॉपर्टी एजंट्सना नवीन कामे मिळतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल. मंगळवारी वाहन चालवताना सावध रहा. व्यवसायात वाढ होईल. स्वतःची प्रतिमा सांभाळा.
उपाय/उपासना-गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा. सावध रहा-मंगळवार, शुभ अंक-5, शुभ रंग- निळा.
तुळ
आर्थिकबाबतीत हा काळ उत्तम आहे. धनार्जनाचे नवीन मार्ग सापडतील. तुमच्या उदारतेचा लोकांनी गैरफायदा घेऊ नये याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सध्या नको. संततीसंबंधी तक्रार येऊ शकते. गुप्तशत्रूंच्या कारवाया थंड पडतील. शनिवार, रविवार ताणाचा, विदेश प्रयाणाचे उत्तम योग.
उपाय/उपासना- देवी अथर्वशिषाचे पाठ करा, सावध रहा- गुरुवार, शुभ अंक-9, शुभ रंग-काळा.
वृश्चिक
तब्येत ठणठणीत राहील. पैशाची आवक वाढेल. नवीन संधी मिळतील. स्वभाव उग्र आणि रागीट झाल्यामुळे लोकांची मने दुखावली जाऊ नयेत याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडल्याने थोडा ताण येऊ शकतो. पण काळजीचे काहीच कारण नाही. वृश्चिकवाल्यांना हा काळ मानसन्मानाचा आणि लाभाचा.
उपाय/उपासना-‘बजरंग-बाण’चे 11 पाठ करा. सावध रहा- शुक्रवार, शुभ अंक.- 8, शुभ रंग-पांढरा
धनु
पाहुण्यांसाठी वेळ काढावा लागेल. त्यांच्या पाहुणचारात तुम्हाला तुमच्यासाठी वेळ मिळणार नाही. बरेच दिवस टाळलेली कामे पूर्ण करावी लागतील. तब्येतीची साथ उत्तम राहील. प्रवास शक्मयतो टाळा. जमिनीचे व्यवहार टाळा. वाहन दुरुस्तीकरता खर्च होऊ शकतो. विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतात.
उपाय/उपासना-लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घ्या. सावध रहा-बुधवार, शुभ अंक-4, शुभ रंग- हलका पिवळा.
मकर
तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर इलाज झाल्यास पुढचा त्रास वाचतो. नशिबावर भरवसा न ठेवता कष्टाची तयारी ठेवा. येणाऱया दिवसात कुणालाही उधार पैसे देऊ नका. बुडण्याची शक्मयता आहे. आर्थिक गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे. पण धोका पत्करू नका. व्यवसायवृद्धी आणि लाभाचे योग.
उपाय/उपासना-‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ चा जप करा. सावध रहा-गुरुवार, शुभ अंक- 8, शुभ रंग-निळा.
कुंभ
तब्येतीच्या, संततीच्या आणि भाग्याच्या दृष्टीने भाग्यवान रास. वैवाहिक सुख उत्तम असेल. अहंकार येऊ शकतो आणि त्यामुळे कुटुंबात वादविवाद होऊ शकतो. जमीन किंवा वाहन खरेदीकरता योग्य वेळ आहे. अचानक धनलाभाचे योग. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी कौतुक होईल.
उपाय/उपासना-शनिवारी पिंपळाखाली दिवा लावा, सावध रहा.-शुक्रवार, शुभ अंक.-2, शुभ रंग-काळा.
मीन
व्यवसायात वृद्धी आणि नोकरीत पदोन्नतीचे योग होत आहेत. या काळात कोणावरही टीका करणे महागात पडू शकते. तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारींमुळे हैराण व्हाल. वाणीचा प्रभाव पडेल. मित्रांची साथ मिळेल. वाहन खरेदी टाळा. गटबाजीमुळे अडचणीत वाढ होईल. संयम ठेवा.
उपाय/उपासना- बुधवारी गणेश दर्शन घ्या, सावध रहा- मंगळवार, शुभ अंक- 7. शुभ रंग- पिवळा.