प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 27018 नमुन्यांपैकी 4011 नमुन्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण मर्यादित असून प्राप्त नमुन्यातून हा आजार 14.84 टक्क्यावर रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याचे दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2 हजार 897 रुग्णांनी आतापर्यंत या आजारावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 17 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
शनिवारी दुपारी 12 वाजता संपलेल्या 24 तासात 83 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 27018
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 4011
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 22796
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 211
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1017
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 97
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 2897
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3626
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4607