प्रतिनिधी/ सातारा :
येथील महत्वकांक्षी असलेले पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्यात आले असतानाच गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रस्ता खचण्याचा प्रकार घडला. ही बाब जेव्हा वाहतूक शाखेचे जवानाने निदर्शनास आणून दिली तेव्हा मात्र बांधकाम विभागातील तेथील टीएण्डटी कंपनीच्या कर्मचाऱयांसह ताराबंळ उडाली. तात्पुरती मलम पट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे.अगोदरच नाक्यावरच्या ग्रेड सेपरेटरच्या कामामध्ये अनेक त्रुटय़ा आहेत.
पोवई नाक्यावर महत्वकांक्षी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काम जलदगतीने सुरुवातीला काही दिवस सुरु होते. त्यानंतर काही दिवसांनी धिम्या गतीने काम सुरु झाले होते.लॉकडॉऊनच्या काळात हे काम कसेबसे उरकत आणले गेले. अनेकदा त्या कामाचे आराखडे बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोवई नाका परिसरात डांबरीकरण करुन घेण्यात आले आहे. बसस्थानकाकडे जाणारी बाजू, राजवाडय़ाकडे जाणारी बाजू आणि कोरेगावकडे जाणारी बाजू हे काम उरकत आले आहे तर कराडकडे जाणाऱया बाजूचे काम सुरु आहे. असे असताना गुरुवारी सकाळी राजपथकडून येणाऱया रस्त्याचा अर्धा फुट भाग खचल्याची बाब वाहतूक शाखेचे जवानांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही धोकादायक बाब असल्याने त्या रस्त्यावरुन वाहतूक होवू नये म्हणून बॅरिकेट लावले. त्यावरुन टीऍण्ट टी कंपनीच्या कर्मचाऱयांची आणि त्यांची थोडीशी वादावादीही झाली.त्याची त्यांनी बांधकाम विभागास त्यांनी माहिती दिली.लगेच बांधकाम विभागाचे अधिकारी तेथे आले अन् त्यांनी पाहणी करत लगेच जेसीबीच्या सहाय्याने तेवढा डांबरीकरणाचा भाग उकरुन काढत पॅचिंग करण्याचे काम नव्याने हाती घेतले. त्याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता रविंद्र आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रस्ता खचलेला नाही. खडी जरा सरकली होती. ते काम करुन घेण्यात येत आहे, असे सांगितले.