प्रतिनिधी / सातारा :
नागठाणे, ता. सातारा येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.अमित सुनील साळुंखे, (वय 30, रा. नागठाणे, ता. सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या युवकाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच गळफास काढून त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.