वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारताचा टेनिसपटू सुमित नागलने आपल्या 2021 च्या टेनिस हंगामाला पराभवाने प्रारंभ केला आहे. येथे सुरू असलेल्या रिव्हर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत बेरानकिसने सुमित नागलचा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
3207775 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या एटीपी 250 दर्जाच्या रिव्हर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात लिथुआनियाच्या रिकार्डेस बेरानकिसने सुमित नागलचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 8 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा सुमित नागल हा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.