न्हावेली /वार्ताहर –
प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत, नाणोस आणि कोकन फार्मास्युटिकल नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १२ जून रोजी सकाळी 8.वाजता कोकण फार्मास्युटिकल राज कोकम फॅक्टरी नाणोस येथे नाणोस गावातील ४५ वर्षावरील नागरीकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण होणार आहे. तरी ज्यांना लसिकरण करावयाचे आहे त्यांनी नाणोस गावातील आपल्या वॉर्ड ग्रामपंचायत सदस्यांजवळ आपली नाव नोंदणी तात्काळ करावी हि विनंती. लसीकरण कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन केले जाईल. येताना मास्क घालून व आधारकार्ड घेऊन येणे असे आवाहन सागर नाणोसकर यानी केले आहे .