वृत्तसंस्था/ यंगून :
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची मंगळ मोहीम काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात होणारे मार्स पर्सिवरन्स रोव्हरचे प्रक्षेपण आता ऑगस्टमध्ये होणार आहे. मंगळ ग्रहावर यान पाठविण्याची संधी 26 महिन्यांमध्ये एकदा प्राप्त होते. मार्स पर्सिवरन्स रोव्हर ही नासाची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या रोव्हरमध्ये बसविण्यात आलेल्या हेलिकॉप्टर इंजेन्युइटीला भारतीय वंशीय विद्यार्थिनीने ना वदिले आहे.
नासा आणि युनायटेड लाँच अलायन्सने प्रक्षेपणाचा पहिल्या प्रयत्न 30 जुलैपूर्वी न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेसक्राफ्ट मेट ऑपरेशन्सच्या तयारीत विलंब होत असल्याने प्रक्षेपक प्रक्रियेलाही विलंब झाला आहे. फ्लाइट ऍनॅलिसि टीम्सने प्रक्षेपणाच्या संधी 15 ऑगस्टपर्यंत वाढविल्या असून त्यापुढील काळातही प्रक्षेपण होऊ शकते का हे पाहिले जात आहे. ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत प्रक्षेपण न झाल्यास पृथ्वी आणि मंगळ ग्रह एका रांगेत येईपर्यंत म्हणजेच 2022 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे घडल्यास नासाला सुमारे 50 कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. याच कारणामुळे नासा 15 ऑगस्टपूर्वी यानाच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहे.