ऑनलाईन टीम / पुणे :
निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करुन त्यातील 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.