वार्ताहर/गोकुळ शिरगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत रविवार 22 मार्चपासून पूर्णपणे बंद झाले आहे. एकही कारखाना गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत मध्ये सध्या चालू नाही, पण या औद्योगिक वसाहती वर जवळपास दहा ते पंधरा हजार लोक या येणाऱ्या महिन्याच्या पगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन, संचारबंदी अशीच राहिली तर महिन्याचा येणारा खर्च कसा भागवायचा हा लोकांच्या समोर खूप मोठा प्रश्न पडल्याचे कर्मचाऱ्यांच्या समोर उभा आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या ठिकाणी दर दिवशी 25 ते 30 हजार कर्मचारी काम करतात. पण यामध्ये बरेच जण स्थानिक औद्योगिक वसाहतीच्या आसपासच्या गावांमध्ये मूळचे राहणारे असल्याने घरची शेती असल्यामुळे अशा लोकांना फारसा फरक पडणार नाही. पण जे बाहेरून येऊन राहिले आहेत व आपला महिन्याचा येणारा पगारावर अवलंबून असणाऱ्या लोकांची धाकधूक मात्र वाढत आहे. कारण एमआयडिसी 14 एप्रिल पासून चालू होणार आहे असे त्यांना वाटत आहे. पण कोरोना चा प्रादुर्भाव व लॉक डाऊन व संचारबंदी अशीच राहिली तर महिन्याचा येणारा खर्च कसा भागवायचा असा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर आहे. त्यामुळे पगार होणार की आणखी वाट पहावी लागणार या विवंचनेत कर्मचारी वर्ग पडला आहे.